Sunday, June 9, 2013

PAAUS

डोळे मिटले रे, चेहरा समोर येता, 
आणख़ी आज़ून मी काय सांगु अता, 
ओठांवर हस्य रेषा, गालावर गोड ख़ळी ती 
बंद पापण्यात शोधते मलाच मि 
केसांच्या बटांना चुंबी ऊनाड वारा 
चिंब भीज़ले मन, जसे श्रावण धारा,
काळजाचा चुके ठोका चाहुल तुझी ऐकु येता
डोळे मिटले रे, चेहरा  समोर येता, 
आणख़ी आज़ून मी काय सांगु अता, 
ओठांना हि ओढ लागे तुझ्या धुंद ओठांची
श्वासांना ही बोलायचे होते, तुझ्या मंद  श्वासांशी 
गुंतायचे तुझ्यात हाच एक छंद आता......
डोळे मिटले रे, चेहरा  समोर येता, 
आणख़ी आज़ून मी काय सांगु अता, 
Vaibhavi Vilas Pradhan

Friday, October 19, 2012

आठवण....

आज आठवणींना आला उधाण,


कंठाशी दाटुन आले प्राण


भावनांचे मांडले मनत रण


परि ना आश्रुंचे सांडले कण


दिसलास तु ओझरता मला


वाटलं कि तु परत आला


होती फक्‍त तुझी छाया,


नाही कि तुझी काया!

नाहिस आज तु आमच्यत तरी,


तुझ्या आठवणी आहेत सदैव आमु्च्या उरी!


Vaibhavi Vilas Pradhan

Sunday, October 7, 2012

शब्द !!!!

शब्द पडले कोरडे, 
भावना ही कोरड्या....
शांत झाली स्पंधने, 
प्रेम वर्षा दाटल्या....

नाहले होते मी अधी, 
त्या प्रेम वर्षात कधी तरी 
सोबत होती तुझी, 
कान होते तुझ्या उरी,

ऐकले होते स्पंधने मी, 
गुज गान ही ऐकले, 
प्रेमाच्या वर्षात तेव्हा,
 मी ही होते नाहले 

वाहुन गेले दिवस ते, 
निशा ही गेल्या त्या,

अंतराच्या उन्हात त्या,
 प्रेम वर्षा दाटल्या

शब्द पडले कोरडे, भावना ही कोरड्या....!!!!!

वैभवी विलास प्रधान 

पाउस...

नाही नाही  म्हणता आला की हा शेवटी

आपल्याला भिजवण्याची तो पुर्ण करणार ड्युटी 

फ़क्‍त भिजवणार नाही... तो खुलवेल निसर्गाची ही ब्युटी 

इत्कच नाही तो.... अजुन बरच काही करेल 

उघडे नाले, रस्त्यावरचे  खड्डे, रेलवे रुळ ही भरेल!

ट्राफ़िक जाम करेल, वाहाता जीवनाला ही काही वेळ धरेल 

माणसाला माणुस्की ची जाण करुन देईल

जमलच तर तो बरच काही देउन ही जाईल

शेत सजवेल, रान पीकवेल, मातिचा गंध खुलवेल 

ह्या सौंदर्‍याने तो आपल्याला भुलवेल 

प्रियकरांना जवळ आणेल, मोठ्यांना ही बालपण देइल...

आनंद देउन, समाधानी करुन,

तो शेवटी निघुन जाईल दुख घेउन....

हा पाउस... हा पाउस...!!!!!!!!!!!!!!

वैभवी विलआस प्रधान 

Thursday, September 6, 2012

पाउस दादा,

पाउस दादा, पाउस दादा... थकला नाहीस कि काय?
  पडुन पडुन... गुढ्गे फुटुन... दुखत नाही का पाय?

आई म्हण्ते आभाल काका चिडला कि पाउस येतो
विज काकिशी हा इतका का रे भंडतो?
पाउस दादा, पाउस दादा...  

आजी सांगते चंद्रमामा रडला कि पडतो पाउस, 
माझ्या मामाल रडवण्याची कोणाल रे हाउस?
  पाउस दादा, पाउस दादा...

बाबा बोलतात देव बाप्पा रडला कि पाउस पडला 
बाबा बोलतात देव बाप्पा रडला कि पाउस पडला 
बाप्पा रडला, पाउस पडला, नक्कि काय घडलं?

 
पाउस दादा, पाउस दादा... थकला
नाहीस कि काय?
पडुन पडुन... गुढ्गे फुटुन... दुखत
नाही क पाय?


वैभवी विलास प्रधान

Wednesday, June 13, 2012

नभ दाटायला आले....

आभाळ फाटायला आले, नभ दाटायला आले
वाऱ्याची झुळूक काही सांगायला आले,
नभ दाटायला आले....

झोंबणारा सूर्य आता निजायला गेला,
आकाशाच्या पदरात शांत विजयाला गेला

ढगांचे पदर मग थोपटायला आले,
चंद्र, तारे मग निजा गान गायला आले
नभ दाटायला आले....

करपलेली चादर आता फुलायला लागली,
शिवार हि आता रंगायला आले
मातीला ही आता गंध नवा आला,
तुषार मनी झेलता हर्ष मनी झाले!!!
नभ दाटूनिया आले...

वैभवी विलास प्रधान
 

Saturday, June 9, 2012

हा पाउस.....!!!

हा पाउस...........

नाही नाही म्हणता आला कि हा शेवटी,
आता आपल्याला भिजवण्याची तो पूर्ण करणार ड्युटी
फक्त भिजवणार नाही, तो खुलवेल हि निसर्गाची ब्युटी!!!

इतकाच नाही तो अजून बराच काही करेल,
उघडे नाले, रस्त्यावरचे खड्डे, रेलवे रूळ पाण्याने भरेल, ट्राफिक हि जाम करेल,

वाहत्या जीवनाला तो जरा वेळ धरेल!
माणसाला माणुसकीची तो जाण करून देईल...
शेत पिकवेल, रान खुलवेल, मातीस गंध हि देईल!!!
ह्या सौंदर्याने तो आपल्याला हि भूलावेल...
प्रेमींना तो जवळ आणेल, मोठ्यांना तो बालपण देईल
असा करून तो निघून जाईल एकाकी....
आनंद देऊन, दु:ख घेऊन तो निघून जाईल शेवटी...

हा पाउस............!!!

वैभवी विलास प्रधान

Sunday, May 27, 2012

कविता


आज बरेच दिवसांनी मी तिल हातात धरले 
काय लिहु नि काय नाहि ह्यचे कोडे मला पडले 
उत्तर सपडले नाही, मात्र, प्रश्नंची उभि राहिली रांग. . .

रांग तोडुन पाहिले, तरी सापडले नाही उत्तर
एक मागे एक प्रश्न उभे राहिले सत्तर. . .
मग मीच विचारले तिला, सुचले क तुल काही उत्तर?

हसत हसत ती म्हणाली, वर बघ जरा तुल ही सपडेल उत्तर
वर बघताच मला हि हसु आले आता,
कारण मझ्याच नकळत रचली गेली होती ही कविता 

वैभवी विलास प्रधान