आभाळ फाटायला आले, नभ दाटायला आले
वाऱ्याची झुळूक काही सांगायला आले,
नभ दाटायला आले....
झोंबणारा सूर्य आता निजायला गेला,
आकाशाच्या पदरात शांत विजयाला गेला
ढगांचे पदर मग थोपटायला आले,
चंद्र, तारे मग निजा गान गायला आले
नभ दाटायला आले....
करपलेली चादर आता फुलायला लागली,
शिवार हि आता रंगायला आले
मातीला ही आता गंध नवा आला,
तुषार मनी झेलता हर्ष मनी झाले!!!
नभ दाटूनिया आले...
वैभवी विलास प्रधान
वाऱ्याची झुळूक काही सांगायला आले,
नभ दाटायला आले....
झोंबणारा सूर्य आता निजायला गेला,
आकाशाच्या पदरात शांत विजयाला गेला
ढगांचे पदर मग थोपटायला आले,
चंद्र, तारे मग निजा गान गायला आले
नभ दाटायला आले....
करपलेली चादर आता फुलायला लागली,
शिवार हि आता रंगायला आले
मातीला ही आता गंध नवा आला,
तुषार मनी झेलता हर्ष मनी झाले!!!
नभ दाटूनिया आले...
वैभवी विलास प्रधान
No comments:
Post a Comment