डोळे मिटले रे, चेहरा समोर येता, |
आणख़ी आज़ून मी काय सांगु अता, |
ओठांवर हस्य रेषा, गालावर गोड ख़ळी ती |
बंद पापण्यात शोधते मलाच मि |
केसांच्या बटांना चुंबी ऊनाड वारा |
चिंब भीज़ले मन, जसे श्रावण धारा, |
काळजाचा चुके ठोका चाहुल तुझी ऐकु येता |
डोळे मिटले रे, चेहरा समोर येता, |
आणख़ी आज़ून मी काय सांगु अता, |
ओठांना हि ओढ लागे तुझ्या धुंद ओठांची |
श्वासांना ही बोलायचे होते, तुझ्या मंद श्वासांशी |
गुंतायचे तुझ्यात हाच एक छंद आता...... |
डोळे मिटले रे, चेहरा समोर येता, |
आणख़ी आज़ून मी काय सांगु अता, |
Vaibhavi Vilas Pradhan |
शब्दांच्या जगात आपले स्वागत! शब्द: स्वयं अपुर्ण असुन ही संभाषण पुर्ण करातात. सुरुवात ही त्यांच्या पासुनच होते. कधी विचार केला आहे जर शब्दच नसते तर?
Sunday, June 9, 2013
PAAUS
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment