नाही नाही म्हणता आला की हा शेवटी
आपल्याला भिजवण्याची तो पुर्ण करणार ड्युटी
फ़क्त भिजवणार नाही... तो खुलवेल निसर्गाची ही ब्युटी
इत्कच नाही तो.... अजुन बरच काही करेल
उघडे नाले, रस्त्यावरचे खड्डे, रेलवे रुळ ही भरेल!
ट्राफ़िक जाम करेल, वाहाता जीवनाला ही काही वेळ धरेल
माणसाला माणुस्की ची जाण करुन देईल
जमलच तर तो बरच काही देउन ही जाईल
शेत सजवेल, रान पीकवेल, मातिचा गंध खुलवेल
ह्या सौंदर्याने तो आपल्याला भुलवेल
प्रियकरांना जवळ आणेल, मोठ्यांना ही बालपण देइल...
आनंद देउन, समाधानी करुन,
तो शेवटी निघुन जाईल दुख घेउन....
हा पाउस... हा पाउस...!!!!!!!!!!!!!!
वैभवी विलआस प्रधान
No comments:
Post a Comment