Saturday, July 2, 2011

आशा

दिले होते वचन तुला ठेविन राजमहाली 

आज आहे फ़क्‍त १० x १० ची खोली

शब्द दिला मी तुला, खाउ घालीन तुप -रोटी

ढकलत आहोत दिवस राहुन आर्ध्या पोटी

सरतिल ते दिवस, येतिल दिवस सुखचे 

होती हे आशा, आता राहिले हे शब्द फ़ुकाचे 

दिवसा मागे सरले दिवस

महिने बदलले वर्षात,

परी हे कटु दिन न बदलले हर्षात 

सर्व काही बदले, आली नवि सत्ता,

माहागले बाकी सारे काही, नाही कि भत्ता!

ह्या आगेत जिवन आपुले जळत आहे

सामान्य माणुस रोज मरत आहे 

कधी बदलणार हे सारं ?  

येतिल का दिस सुखाचे?

पोट भरुन जेवण, कि राहतिल दिस भुकाचे?

बदलेल हे सारं काही, मनात हिच आशा आहे,

ह्या आंधळ्या आशेवरच जगण्याची दिशा आहे! 

वैभवी विलास प्रधान

No comments:

Post a Comment