Wednesday, June 8, 2011

अस्त

मावळतीला सुर्य , आला चंद्र नभा वरी

काळे काळे मेघ दाटुन आले माझ्या उरी

विजा चमकल्या ह्रुदयात, याद तुझी आली 

आश्रुंचे ही पाउस पडला जणू श्रावण सरी

मनात होता याद कल्लोळ, सुख दु:खांच्या पाउल खुणा,

उमटले होते तुझे ठसे उरात माझ्या रे साजणा!

जपले होते दवबिंदु मी, लपवल्या होत्या रंगीत काचा,

सजला होता मझ्या मनात त्या दिवसांचा साठा 

राहत होतो महसभेत दोघी राजा-राणी, 

तुडवुन गेलास एक सकाळी, राहिली अधुरी कहाणी

अवचित गेलास, असा अचानक तु एक सकाळी 

भैरवी चे सुर गुंजले, नही की भुपाळी

निघुन गेलास ज्या वाटेवर, त्यावर आता मि चालत आहे

सरली सकाळ आयुष्याची, आली आता रात्र आहे

थांब तु त्या क्षितिजावरती, जेथी आकाश -धारा भेटती,

अस्त होतो सुर्याचा, प्रेम ज्वला पेटती!

Vaibhavi Vilas Pradhan

No comments:

Post a Comment