Friday, June 10, 2011

बालगंधर्व

आभर मायबापा, उपकार देवा,
अवतरले बालगंधर्व ,कराया नटवराची सेवा ,
श्रोतांच्या मनातला हा अनमोल ठेवा ,
अप्सरेला हे वाटे त्या भामिनीचा हेवा,
अनंत अस्वाद घ्यावा असा हा मेवा!

सिंधु, शारदा, शकुंतला च्या नशिबी विषाचा 'एकच प्याला,'
सुरांच्या पावसात रसिक देवता न्हाला,

नाटयसंगिताचा हा जन्मदाता,
किति गुणगान गाउ ह्याचे मि आता !

जसे मेघास संगे येई उनाड वारा, 
जसे नभात फुले सप्तरंगी फुलोरा ,
सागराच्या  ह्रुदयात मोतीचे दाणे ,
कोकिळा जन्मे घेउन कंठात गाणे ,
जसा यक्ष  जगे घेउन विरहाचे लेणे ,
असा हा बालगंधर्व  कधीही ना होणे !

वैभवी विलास प्रधान
 

No comments:

Post a Comment