पहाट झाली रिक्षा आली,
भातुकलीच्या दिवसात घेउन गेली
नाचत आले ते अल्लड दिस
खांद्यावरचे ओझे, पुस्तकातले मोरपिस!
ऐकु आले ते भांडण
खिडकी साठी भांडयचे प्रत्येक जण
शाळेत बाकासाठी व्हयची स्पर्धा,
मधल्या सुट्टीत खाउ व्हायचा आर्धा आर्धा
शाळा सुटल्यावर घरीजायची घाई,
खेळयापुढे खाउ, वगरे काहिच सुचायचे नाही
घरी आल्यावर व्हायचा अभ्यास
भाषा, गणित, विज्ञान, भुगोल व इतिहास
डोळे मिटता मिटता आई भरवायची घास,
बाबा ही आणयचे गम्मत खास,
शाळेच्या सुट्टित जायचो मामाच्या गावा,
चिंच, कैर्या लुटायचो, करायचो मज्ज तेव्हा
कळले नाही तेव्हा, बालपण एक वर्दान आहे,
तेव्हा फ़क्त शाहणे व्हायची वाट पहात राहे
अचानक आली जाग मला, धुसर झाले सर्व काही,
सरले ते दिवस, लहानपण उरलेच नाही
उगाच झालो मोठे,का झालो शहाणे,
राहिली थोडी मस्ती करायची, मनत आहे उणे
ऐकु येतात परी कथा, ऐकु येते तिच कहाणी,
एक होता राजा, एक होती राणी...
काहिच ना उरले आता, केवळ डोळया मध्ये पाणी!!!!
वैभवी विलास प्रधान
No comments:
Post a Comment