मी बसले होते एकटी, समोर तो अचनक आला
थोडा थकलेला, थोडा उदास वाटला मला,
काय झाले? मी विचारले,
नजर समोर करताच दिसले त्यात पाणी,
चेहरा होता रडवेला, होती थरथरलेली वाणी,
निघालो मी आता, निरोप आखेरचा घ्यायला आलो,
जाता, जाता एक आखेरचा सलाम द्यायला आलो
केल्या खूप गमती -जमती, सुख, दु: खाच्या वर्षात नाहिलो,
तुमचा सोबत ३६५ दिवस मजेत राहिलो,
आता मला जायला हवं, वेळ जाण्याची झाली आहे,
काहिच क्षणात तुमचा आयुष्यावर उमलणार नवी वेल आहे,
त्या वेलिचं होवो मोठ व्रुक्ष, हीच सदिच्छा ,
तुम्हा सर्वांना नविन वर्षाच्या शुभेच्छा!
Vaibhavi Vilas Pradhan
No comments:
Post a Comment