Wednesday, March 16, 2011

UNPUBLISHED ARTICLES -1 INTERVIEW WITH RAVI JADHAV

‘मला लोकांच्या स्मरणात एक उत्तम माणुस म्हणुन राहिला अधिक अवडेल!’ – रवि जाधव
सर्व जगाला नाद खुळा करणारा चित्रपट ‘नटरंग’ चे लेखक-दिग्दर्शक, रवि जाधव सध्या त्यांच्या आगामी चित्रपटाच्या पोस्ट प्रोडक्षन मधे व्यस्त आहेत.
तरीही, आपल्या व्यस्तगत कारभारातुन वेळ काढुन रविजिंनी मनमोकळ्या गप्पा मारल्या.
ठाणे मधल्या कोरम Mall च्या Café Coffee Day  मध्ये गरम गरम coffee घेत गप्पा अधिकच रंगत गेल्या.
मेहनतिचे फळ
जे. जे. स्कुल अर्ट्स मधुन पदवी घेउन मी १९९५ ला ड्राफ़्त FCB ऊल्का जाहिरात एजन्सी मधे रुजु झालो.
तब्बल १२ वर्षे जाहिरात क्षेत्रात क्रिएटिव्ह  कंसल्टंत म्हणुन मी कार्यारत होतो.
ह्या क्षेत्रात अधिक क्रिएटिव्ह काम कारायला मिळावं म्हणुन लोकं नोकर्‍या बदलत राह्तात.
मी मात्र तसं केल नाही. एकच काम करत बसणे मला मान्य नव्हतं. सुदैवाने ह्या एजन्सी मधे मला अनेक विभाग होते म्हणुन मला माझ्यातल्या कलेला वाव देता आला. अनुभवासाठी वेगवेगळ्या विभागात काम करत राहिलो. प्रथम मी एक्झिबिशन, इव्हेण्ट मेनेजमेंट, बेसिक डिझाईन,  ह्या विभागात काम करु लागलो. त्यात मी पुरस्कार मिळवले. 
नंतर मी  प्रेस आणि मेगझिन ads विभागात ही काम केले.
तिथे मी बेस्ट केम्पेन चा पुरस्कार पटकवला.’
ईच्छा तेथे मार्ग
दिग्दर्शनाच्या ओढीने मी नोकरी सोडली व ‘नटरंग’ घडला.
एक उत्तम चित्रपट काढायचे आहे, हीच मनाशी गाठ बांधुन काम सुरु केले,
आणि त्याचा परिणाम सर्वांच्या समोर आहेच. पण हा प्रवास ही काही सोपा नव्हता.
नटरंग ची पटकथा लिहिणे सोपे नव्हते.
 Dr. आनंद यादव ह्यांची कादंबरी नटरंग ची मुळ कथा फ़ार गंभीर व काळजाला पीळ देणारी आहे,
आणि ही कथा चित्रपटाद्वारे लोकांपर्यंत पोहोचवणे हे एक फ़ार मोठा आव्हान होते.
त्यासाठी बराच आभ्यासही करावा लागला. मी स्वत:  तमाशाचे प्रयोग पाहिले, त्या लोकांना भेटलो,
त्यांची राहणिमान, त्यांच्या व्यथा, समजुन घेतल्या. त्यांची व त्यांच्या परिवाराची होणारी अवहेलना,
फरफट, समाजाने त्यांना दिलेली  मानहानी ह्या वर बरेच गोष्टी समोर आल्या.
नटरंग करताना  जाहिरात क्षेत्रात मिळालेला दाडंगा  अनुभव मला इथे कामी आला. प्रत्येक बारिक बाबिंवर
माझं निट लक्ष होत. पटकथा लिहिण्यापासुन ते दिग्दर्शनापर्यंत व प्रोमो पासुन ते मार्केटिगपर्यंत
मला मिळालेला अनुभव येथे स्तकार्णी लावता आला. सर्वांनीच उत्तम कामगिरी पार पाडली.
फार मेहनत घेतली. निवड्लेला रस्ता सोपा नव्ह्ता. पण तंत्रज्ञानाची, कलाकारंची साथ, प्रगल्भ इच्छाशक्‍ति,
कठोर परिश्रम, वा अनुभव ने मझे काम बरेच हलके केले. प्रत्येकाने स्व:ताचा चित्रपट समजुन काम केल.
नटरंग’ ने मराठी सिनेमाला एक वेगळ्या उच्चांकावर नेऊन ठेवलं.  लोककला ही महाराष्ट्राची जुनी कलाक्रुती आहे,
पण आजुन ही ह्या कलेला म्हणावा तसा मान मिलत नाही. ह्या चित्रपटाच्या माध्यमाने लोकं कलाकारांची व्यथा, त्यांची जीवनाशी चालणारी झुंझ लोकांपर्यंत पोहचावी हाच प्रामाणिक प्रयत्न.'
हा प्रयत्न यशस्वी झाला असं म्हणायला हरकत नाही, असं म्हणताच रवि जी म्हणाले,
'हो, नक्किच. लोकांनी फार छान प्रतिसाद दिला. पुरस्कारंचा पाउस ही पडला,
पण ज्यांनी तमाशा कलवंतांवर जीवनपट लिहिले, ते श्री. आनंद यादव ह्यांचा कडू न मिळालेली  शाबासकीची थाप हिच माझ्यासाठी सर्वात मोठी पावती होय.
पण इतक्यानेच भागणार नाही. भविष्यात असे व ह्या विषयांवर चित्रपट आले पाहिजे
म्हणजे लोक कला संस्क्रुती जिवंत व तग धरुन राहिल.’
बालगंधर्व - आगामी आकर्शण
‘माझ्या आगामी चित्रपट बालगंधर्व चे पोस्ट प्रोडक्शन चालु आहे. तो एप्रिल- मे मध्ये रिलीझ होईल.
ह्या चित्रपटाची कल्पना सुबोध भावे ह्यांची आहे.  त्यांनी ह्या व्यक्तिरेखेवर खूप अभ्यास केला आहे.
ते ही भुमिका उत्तम साकरतील ह्यात काहि शंका नाही. श्री नितिन चंद्रकांत देसाइ ह्या चित्रपटाचे निर्माते आहे.
दुसर्‍या निर्मात्या बरोबर काम करणे व होम प्रोडक्शन मध्य काम करणे ह्यात बराच फरक आहे.
होम प्रोडक्शन मध्य सारे निर्णय व त्यांची जवाबदारी ही स्व:ताची असते,
पण दुसर्‍या निर्मात्या बरोबर काम करताना आपल्याला त्यांची मते समज़तात.
नाण्याची दुसरी बाजु ही समजते. श्री नितिन देसाइ हे ह्या क्षेत्रात गेले २५ वर्षे आहेत.
त्यांच्या हाताखालून बरेच उताम उत्तम कामे साकारली गेली आहेत. त्यांच्या बरोबर काम करणे
हा एक वेगळा अनुभव आहे. भव्य दिव्य सेटस, उत्तम कलकार, अप्रतिम कलाक्रुती,
व अद्भुत कथा ने नटलेला बालगंधर्व चित्रपट सर्वांना मोहुन टाकेल.'
वेग वेगळ्या प्रकार्चे चित्रपट करायला आवडतिल
‘दोनही चित्रपट लोकं कलेवर आधारीत आहेत, म्हण्जे ह्या पुढे ह्याच विषयावर चित्रपट करेनच असे नाही. मला वेग वेगळ्या विषयांवर चित्रपट करायला नक्किच आवडेल. तरतर्‍हेचे चित्रपट नक्कि करेन. पण कथा चांगली हावी. कुठल्याही चित्रपटात कथा ही फार महत्वाची असते. कथा चंगली असेल तर बाकिच्या गोष्टी आपोआप चांगल्या घडत जातात.’
मराठी पाऊल पडते पुढे
‘हल्ली मराठी चित्रपटाला चंगले दिवस आले आहेत. उत्तम उत्तम चित्रपट येत आहेत.
लोकांचा प्रतिसाद ही चांगला मिळत आहे. लोकांना वेगवेगळ्या विषयांवर चित्रपट पाहिला आवडतात
वा आम्हाला ते बनवायला. हे जर असच चालु राहिलं तर तो दिवस फार दुर नाही
जेव्हा मराठी चित्रपट स्रुष्टी अधिराज्य गाजवेल ह्या मनोरंजक जगतावर.
सध्याचे दिग्दर्शक मझे प्रतिस्पर्धी नसुन चांगले मीत्र आहेत.
उमेश कुलकर्णी (विहिर), राजिव पाटील(जोगवा), परेश मोकाशी (हरिश्चंद्राची फ़ेक्‍टरी) आम्ही बरेच वेळा एकत्र भेटतो, चर्चा करत असतो. कोणीही कोणाचा प्रतिस्पर्धी नाही. एकामेकांच्या आयुष्यातिल प्रत्येक बाब माहित असते.
ह्या क्षेत्रात खूप गुणी कलावंत आहेत, आणि मला आभिमान आहे की मी अशा लोकांच्या संपर्कात आहे.
अभिराम भड्कमकर, गुरु ठाकूर, अजय - अतुल, विभावरी देशपांडे, अतुल कुलकर्णी, सुबोध भावे, असे व अनेक कलावंत आहेत, यादी संपणार नाही. प्रत्येक आप आपल्या कामात उत्तम आहे.
एकाची दुसर्‍याशी बरोबरी करण योग्य ठरणार नाही.’
काय खुपते?
काही दिग्दर्शक comedy च्या नावाखाली अर्थशुन्य चित्रपट काढतात व चित्रपटस्रुष्टीला कलाटणी देण्याची वाच्चता करतात. Comedy चित्रपट करणे इतके सोपे नव्हे. लोकांना हसवणे सर्वात कठीण काम आहे.
बदलाव च्या नावा खाली किंवा नाविण्याच्या नावा खाली जे चालते ते खुपते.’
यशाची गुरुकिल्ली
मी एका वेळेस एकच काम करतो. सध्या माझ संपुर्ण लक्ष मी बालगंधर्व चित्रपटावर केंद्रित केले आहे. 
मी लवकरच एक नविन चित्रपटावर काम सुरु करणार आहे. हा चित्रपट मी स्वत:च्या बेनर खाली काढणार आहे.
पण अजुन काही नक्की नाही. बालगंधर्व प्रकाशीत होई पर्यंत मी दुसर काहिच करणार नाही.
आपलं संपुर्ण लक्ष व वेळ एकाच वेळी एकाच  कामासाठी खर्ची केला तर ते काम नक्किच उत्तम होतं.’
ओळख
एक चांगला दिग्दर्शक किंव्हा चांगला लेखक म्हणुन माझी ओळख झाली तर मला नक्किच आनंद होईल पण त्याहिपेक्षा  मला लोकांच्या स्मरणात एक उत्तम माणुस म्हणुन राहिला अधिक आवडेल!
नव्या आकाशातला रवि
आता पर्यंत आपण रवि जाधव ह्यांची ओळख एक चांगला दिग्दर्शक, पटकथा लेखक म्हणुन झाली आहे.
पण फ़ार कमी जणांना माहीत असेल की रवि एक उत्तम कवी ही आहेत.
ते कविता पण तितक्याच सहजतेने करतात. त्यांना छायाचित्राची पण ओढ आहे.
कुणाच ठाउक येणार्‍या काही वर्षात रवि जिंचे नाव उत्तम गीतकारंमधे झळकेल!

गप्पा मारता मारता वेळ कसा सरला हे समझलेच नाही. 
सहज घडाळ्याकडे पाहीलं तेव्हा लक्षात आले की निघायची वेळ झाली आहे. 
रविजींना शुभेच्छा देउन मी घरा कडे नीघाले. 
एक चांगला दिग्दर्शकाला भेटले कि एका उत्तम माणसाला हे सांगणे कठिण.
वैभवी विलास प्रधान

No comments:

Post a Comment