नदी सवे निर्मळ, थंड वार्याची झुळुक तू |
अग्नी सवे ज्वलंत कधी, शांत शीतल रात्र तू |
रंभा ,राधा, सीता, सावीत्री, तर कधी आहिल्या, मीरा तू |
असत्याच्या पाठीवर, सत्याची काठी तू |
दु:खाच्या कातरवेळी, हास्याची पहाट तू |
आश्रू पिऊन, इतरांसाठी आनंदाची लाट तू |
संकटांच्या तलवारी समोर, ऊभी भ्क्कम ढाल तू |
बोचर्या उन्हात ही, सावली देणारं आभाळ तु, |
किती सांगु रुप तुझे, किती गाउ गौरव गाणी, |
स्त्री जन्मा ही तुझी कहाणी, स्त्री जन्मा हीच तुझी कहाणी! |
वैभवी विलस प्रधान |
शब्दांच्या जगात आपले स्वागत! शब्द: स्वयं अपुर्ण असुन ही संभाषण पुर्ण करातात. सुरुवात ही त्यांच्या पासुनच होते. कधी विचार केला आहे जर शब्दच नसते तर?
Tuesday, March 8, 2011
स्त्री जन्मा ही तुझी कहाणी
Subscribe to:
Post Comments (Atom)
very nice....superb...
ReplyDelete