तुझ्यात माझ्यात आहे असं नातं,
हयात ओठांनी नाही, डोळ्यांनी बोललं जातं
शब्दांची येथे चालत नाही मोनोपोली,
ह्याला कळते फ़क्त नयनांची बोली
तु समोर येता, काळजाची धकधक वाढते,
गोष्ट ओठांवर येउन, तिथेच आडते
मनातलं गुपीत मग डोळ्यातुन दिसते,
शब्दांची, ओठांची मग गरजच नसते!
वैभवी विलास प्रधान
No comments:
Post a Comment