Friday, January 28, 2011

आठवण

कसं सांगु रे तुला, काहीच मला सुचत नाही


क्षणोक्षणी, वेळोवेळी, याद तुझी छळत राही


तु समोर असता, पापण्या लाजेत बुडुन जाई  


दुर तु जातो जेव्हा, त्या तुला शोधत राही 


थरथरणारे ओठ तुला  सर्व काही सांगुन जाती  

तुझ्या कानात मात्र  शब्द ते कधीच पडत नाही 


छेडुन गेला वारा, तुझ्या स्पर्शाचा भास झाला, 


असे का होते , कळत नाही मला 


डोळे तुला शोधत राही, पाणी त्यात ठरत नाही


दिवस तुझ्या आठवणीत जातो, रात्र मात्र सरत नाही!  


वैभवी विलास प्रधान 

1 comment: