Saturday, July 23, 2011

UNPUBLISHED ARTICLES -3


चार दिवस सासुचे

सासु आणी सुन ह्यांचं नातं हे फ़ारच वेगळ असतं. जेव्ढं नाजुक तेव्ढंच ते कठोर ही असतं.

सासु कधी कठोर होते, तर कधी आईची माय ही लावते. नावीन सुनेला ती घरात रुळायला मदत करते.

घरातले नियम ही तीला समजवते.  ती वेळेस स्वत: सुनांच्या बाजुने उभी राहते.

आपण मालिकां मधे बघतो की सासु ही नेहेमीच सुनेचा छळ करते. सुनेला जगणं नकोसं करते.

पण असं ख़रच असतं का ख़रं चित्र वेग्ळच असतं?

काही घरात सुनांचा छ्ळ होतोकुठे सुनांना हुंडा साठी जाळतात.

तर कधी सुना सासरच्या माणसांना घराच्य बाहेर काढतात. पण हे तर काही घरातच असं होतं.

बाकी घरात असं काही होत नाही.

सध्याचं चित्र फ़ारच वेगळं आहे. सध्याची सासु ही सुनेची फक्त सासुच नाही तर एक चांगली मैत्रिण ही
असते.

असं म्हणतात कीएक स्त्री दुस-या स्त्रीची चांगली मैत्रिण किंव्हा सर्वात वाइट शत्रु असते.”

जर हे खरं असेल, तर चांगली मैत्रिण का होऊ नये? तुम्हाला मैत्रिणीची गरज कधी ही लागु शकते, नाही का?      

सासु आणी सुन हे एका माळ्याचे दोन टोकं असतात. जर हे दोनंही टोकं एकत्र असतील तर माळ ही अखंड राहते.

काही दिवसंपुर्वी मी एक किस्सा वाचला होता. त्यात सासु सुनेचे नातं फार सुंदर गुंफले होते.



संध्याकाळी जेव्हा गौरव घरी आला, त्याच्या आईने दार उघडले. आईला बघुन त्याला फार आनंद झाला.
 
ग्रेटाने आपल्याला बोलवुन घेतल्याचे आईने गौरवला संगितले. त्या रात्री तीघांनी खुप गप्पा मारल्या.

आई जितके दिवस मुंबईत होती तिके दिवस तिघांनी खूप मज्जा केली. आई महिनाभर राहिले आणि गावी परत गेली.

काही दिवसांनतर ग्रीटाला आईचं पत्र आलंत्यात आईने ग्रेटाचं खूप कौतुक केल. ग्रीटाच्या ह्या वगणुकी मुळे

सासु सुनेचं नातं आधिकच घट्ट झालं.

सासु आणी सुन ह्यांच्या मधे पीढचं अंतर असल्या मुळे बरेच वेळा क्लेश होतात. आणि हेच क्लेश मग भांडनात

बदलतात. दोघांनी जर थोडीशी माघार घेतली, तर प्रत्येक घरात सुख, शांति अणि समधान नंदेल.

भांडण तेव्हाच होतात जेव्हा गैरसमझ आणि मनातील आडी वाढते. पण हे सगळं थांबवता येतं.

ह्या कडता दोघांनी एका मेकांना समझुन घ्यायला हवं.


सुखी घरासाठी काही सुचना. बघा जमतय का?

प्रथम सुनांसाठी

तुमच्या सासुला तुमच्या आई इत्काच मान द्या.

त्यांची काळजी स्व:ताच्या आई इत्कीच घ्या.

सासुला आपली सखी माना, प्रतिस्पर्धी नाही.

त्यांना दुखवु नका. कारण जर त्या आनंदी तर तुमचा नवरा ही आनंदी.

तुमच्या घरातली भांडण चार भिंतिंच्या आतच ठेवा. जगजाहीर करुन लोकांना चगळाया विषय देउ नका.

दोघांमधली आडी , चर्चा करुन घरातच सोडवा.

तुमच्या सासुला एखाद दिवशी फिरायला घेउन जा. त्यांच्या साठी भेटवस्तु घ्या.

कधी त्यांचे आवडते पदार्थ बनवा.

तुम्ही जर नोकरी करत असाल, तर एक दिवस सुट्टी काढुन, त्यांच्या बरोबर घालवा.

एखाद दिवशी त्यांच्या मैत्रिणींनसाठी खास असा बेत आखा.

त्यांना बाहेर घेउन जा, नाटक, सिनेमा किंव्हा त्यांच्या आवडत्या ठिकाणी.

आता सासुंसाठी

तुमच्या सुनेला प्रेमाने, आपुलकी ने वागवा.

तिचा मनापासुन स्वीकार करा. तुमच्या मुलाने तिला पसंत केली आहे. तुम्ही पण तिचा मनापासुन स्वीकार करा.

तुम्ही त्याची प्रत्येक नीवड स्वीकारली, त्याचं शिक्षण आसो, खेळणं, किंव्हा त्याचे कपडे; मग आता ही हे कठीण नाही.

त्याच्या बायकोची सारखी सारखी त्याच्या कडे तक्रार करु नका. तुमच्या मधले क्लेश स्व:ताच सोडवा.

तुमच्या मुलाच्या आयुश्यातला हा बदल आनंदाने स्वीकारा.

तिला तुमची मुलगी म्हणुन जवळ घ्या.

तिला घरातले निति- नियम शिकवा. ति चुकली तर तिला संभाळुन घ्या.

घरात रुळायला तिला थोडा वेळ द्या.

तिला थोडं तिच्या मनासार्खे वागुन द्या.


लक्ष्यात घ्या:

मायेनी वाढते माया, प्रेमाने वाढते प्रेम.”

आनंदाने राहुन, टिकेल संसाराची फ़्रेम.”

सासु कधी सुन होती, सुन ही होइल सासु कधी,”

आता जिथे तु आहेस, होते तिथे मी आधी

सुन आली घेउन घरा, दिवस आनंदाचे, हासुचे,

आता आली सुनेची सत्ता, राहिले चार दिवस सासुचे!”

वैभवी विलस प्रधान

No comments:

Post a Comment