बोल ना रे माझ्या मना,
कोणाच्या ह्या पाउलखुणा,
होता का रे कुणाचा वास येथे,
का झाला भास मला, आभास मला....
दिसली होती छबी मला,
आंधारात कुणी मारली हाक
ऐकु आले साद कुणाचे,
सारुन गेला आठवणिंची राख,
आल्याचा झाला का भास मला, आभास मला!
उमटले कसे इथे ठसे,
गुंजतो का आवाज इथे?
बांधले जणु कुणी इथे,
स्वप्नाच्या चांदचुरर्याचे महाल जसे
कुणीतरी येउन गेल्यचा झाला का
भास तुला,
आभास मला!
वैभवी विलास प्रधान
No comments:
Post a Comment